लखनऊ । उत्तर प्रदेशातील विधानसभेत स्फोटके मिळाल्याच्या प्रकरणी एटीएसने समाजवादी पक्षाचे आमदार मनोज पांडे यांची चौकशी केली. एटीएसने सुमारे 15 मिनिटे पांडे यांची कसून चौकशी केली. सभागृहात खतरनाक स्फोटके सापडली होती. पेंटाएरिथ्रोटॉल टेट्रानाईट्रेट ही स्फोटके सापडल्यामुळे
तणाव निर्माण झाला होता.
150 ग्रॅमची स्फोटके सापडली
150 ग्रामची ही स्फोटके ही विरोधी पक्षांच्या सदस्य सपाचे आमदार मनोज पांडे यांच्या आसनाखाली ठेवली होती. तपास यंत्रणा आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान विधानसभेत स्फोटके आतमध्ये कशी आणली हा पहिला प्रश्न असून त्यावर पुढील तपासाची दिशा अवलंबून असणार आहे. त्यामुळे सर्व सदस्यांची चिंता वाढली आहे. सभागृहाच्या आतामध्ये ही शक्तीशाली स्फोटके आलीच कशी अशीही चौकशी पोलीस करत आहेत. एटीएसच्या पथकातील असिस्टंट इंजिनियर अखिलेश कुमार, वीरेंद्र दुबे, यतींद्रनाथ सिंह, गुलफाम ऑपरेटर, सुरेश दुबे यांसह अनेक चतुर्थश्रेणी कर्मचार्यांचीही चौकशी केली.