विधानसभेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा ५०-५० चा फॉर्म्युला; मित्रपक्षाला ३८ जागा !

0

पिंपरी: विधानसभेच्या निवडणुकीसाठी जागावाटपाचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी १२५ जागा कॉंग्रेस तर १२५ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निवडणूक लढविणार आहे. तर उर्वरीत ३८ जागा मित्रपक्षांना देण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषेदेत दिली.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर भाजपने ‘महाजनादेशयात्रा, राष्ट्रवादीने ’ ‘शिवस्वराज्य यात्रा’ तर शिवसेनेने ‘जनआशिर्वाद’ यात्रा काढली आहे. राष्ट्रवादी-कॉंग्रेसची आघाडी झाली असली तरी भाजप-सेनेची युतीबाबत अद्याप संभ्रम आहे.

दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढविणार आहे. या जागांमधील ५ ते ६ जागा अशा आहेत, ज्या राष्ट्रवादीकडे असून कॉंग्रेस त्या जागांची मागणी करत आहे. तर, ५ ते ६ जागा ज्या कॉंग्रेसकडे आहेत. त्या जागांची मागणी राष्ट्रवादी करत आहे. त्यामुळे सामंजस्याने या जागांची अदलाबदली करण्यात येईल. त्याच प्रमाणे उर्वरीत ३८ जागा मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.