विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी 

0
मुंबई : विधान परिषदेवर नवनिर्वाचित झालेले उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे- पाटील, सुरेश रामचंद्र धस, रामदास भगवानरावजी आंबटकर, नरेंद्र भिकाजी दराडे, विप्लव गोपीकिसन बाजोरिया या पाच सदस्यांना सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार सर्वश्री राज पुरोहित, विजय उर्फ भाई गिरकर, अनिल सोले, गोपीकिसन बाजोरिया, डॉ.नीलम गोऱ्हे आदींसह विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे आदी उपस्थित होते.