विधान परिषदेसाठी भाजपकडून चार उमेदवार जाहीर: गोपीचंद पडळकर यांना संधी

0

 मुंबई: 21 में ला महाराष्ट्रात 9 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. जवळपास प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहे. दरम्यान आज भाजपने चार उमेदवार जाहीर केले आहे. यात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील,, प्रवीण दटके, अजित गोपीछडे यांना भाजपने संधी दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात लढविली होती. मात्र त्यांना आता भाजपने संधी दिली आहे.

विधान सभेच्या निवडणुकीच्या तोंडावर गोपीचंद पडळकर, रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी आमदार शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांचे नाव निश्चित केल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केले नाही. देशात लॉकडाऊन असतांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने तत्पूर्वी त्यांना आमदार होणे आवश्यक आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक घेण्यात येत आहे.