मुंबई: विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक आज मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनात झाली. यात महाविकास आघाडीकडून आमदार नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची पुन्हा एकमताने बिनविरोध निवड झाली. आमदार डॉ.नीलम गोऱ्हे या युती सरकारच्या काळात देखील उपसभापती होत्या. त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली.
भाजपने मात्र या निवडीवर आक्षेप घेतला आहे. भाजपकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोनामुळे भाजपचे अनेक सदस्य सभागृहात हजर राहू शकत नाही, त्यामुळे मतदानाच्या अधिकारापासून ते वंचित राहिले असल्याने त्यांनी याचिका दाखल केली आहे.