विधान परिषद निवडणूक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अर्ज दाखल

0

मुंबई: 21 में रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अर्ज दाखल केला आहे. विधान भवनात त्यांनी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, शिवसेनेच्या नीलम गोर्हे, काँग्रेसच्या राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आदी उपस्थित होते. काँग्रेसने एकाच जागेवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपने चार जागांवर उमेदवार दिले आहे.