विधान भवनात मराठी भाषा गौरव दिन साजरा !

0

मुंबई: आज मराठी भाषा दिन साजरा केला जातो आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने विधान भवनात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीत, सर्व मंत्रिमंडळाचा ग्रंथदिंडीत सहभाग घेतला. विधानभवनात मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम सुरु असून याठिकाणी मुख्यमंत्री यांच्यासह विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, दोन्ही विरोधी पक्षनेते, मंत्रिमंडळ, सर्व आमदार उपस्थित आहेत.