वरणगाव। गेल्या अनेक वर्षापासून नानासाहेब धर्माधिकारी यांच्या संस्थेच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला जोडण्याचे काम सुरू आहे. त्या माध्यमातून बेटी बचाव, स्वच्छता अभियान, वृक्षरोपण, पर्यावरण संतूलन, अंधश्रध्दा निर्मूलन, हुंडाबळी अशा विविध उपक्रमातून सदगुरूच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य त्याच्या हातून घडत असून आध्यात्माला विधायक कामांची जोड दिल्याने खर्या अर्थाने परिवर्तन होत असल्याचे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले. फुलगाव येथील प्रवेशद्वाराच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार रक्षा खडसे, मुंबईचे उपविभागीय अधिकारी उत्तमराव शेळके, दीपनगर केंद्राचे अधिकारी अभय हरणे, वरणगाव नगराध्यक्षा अरुणा इंगळे, सरपंच ललिता महाजन, माजी सभापती राजेंद्र चौधरी, पंचायत समिती सभापती सुनिल महाजन, उपसभापती मनिषा पाटील, जिल्हा परिषद सदस्या सरला कोळी आदींच्या हस्ते गणपती व नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन
करण्यात आले.
शासनानेही घ्यावा कामांचा आदर्श
पुढे आमदार सावकारे म्हणाले की, नानासाहेबाच्या संस्थेचे काम कौतुकास्पद आहे. त्याची कितीही स्तूती केली तरी ती कमीच आहे. माणसा-माणसांचे अंतःकरण जोडून स्वच्छ करण्याचे काम या संस्थेकडून केले जात आहे. त्यांच्या संस्थेत जनजागृती करणारे लोक मोठ्या प्रमाणात आहे. शासनाने अशाच पध्दतीचे कामे केली तर मोठ्या प्रमाणात गावाचा विकास होईल. खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, सदगुरुच्या बैठका होतात तेथे शासनाच्या माध्यमातून विकासात्मक कामे केली पाहिजे. माजी सभापती राजेंद्र चौधरी यांनी श्री सदस्यांचे कामाचे कौतुक केल्याचे सांगीतले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी सुधाकर जावळे, शेख अकलाख, राजेंद्र चौधरी, सुनिल काळे, गोलू पाटील, सुनिल कोळी, रवि सोनवणे, मिलींद मेढे, राजकुमार चौधरी, समाधान पवार, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, ग्रामसेवक के.ए. भंगाळे, जागृती बढे, शशी कोलते, रोहिणी जावळे, माला मेढे, उर्मिला चौधरी, अनिता गुरचळ, सुजाता महाजन, प्रिती पाटील, कामीनी मार्तंडे, लक्ष्मण पाटील, विलास महाजन तसेच फुलगाव ग्रामपंचायतीचे सरपंचांसह सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविका नरेंद्र महाजन यांनी केली तर सूत्रसंचालन एम.आर. चौधरी यांनी केले. आभार नरेंद्र महाजन यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत, श्री सदस्यांसह गावकर्यांनी परीश्रम घेतले.