मुंबई-मराठा आरक्षण मुद्दा सध्या चर्चेत आहे. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाला आहे. धनगर समाज आरक्षणाचा ‘टीस’चा अहवाल देखील प्राप्त झाला आहे. मात्र हे दोन्ही अहवाल सभागृहात ठेवण्यात आलेले नाही. दरम्यान आज विधीमंडळ अधिवेशनात दोन्ही सभागृहात गदारोळ पाहायला मिळाले. विधान परिषदेत विरोधकांनी अहवाल सभागृहात ठेवावे, त्याशिवाय सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका घेतल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दोन्ही अहवाल सभागृहात ठेवण्यास सरकारला काय अडचण आहे? असा प्रश्न उपस्थित केला. अहवाल सभागृहात ठेवत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.
विधानसभेत मुख्यमंत्री संतप्त झाले. मुख्यमंत्र्यांनी विरोधका सत्तेत असतांना मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला का आरक्षण दिले नाही? असे आरोप केले आहे. विरोधक मताचे राजकारण करत असल्याचे आरोप मुख्यमंत्री यांनी केले.