विधि विद्यापीठांना पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी पाच कोटी रुपये निधी देणार

0

मुंबई :- मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधिविद्यापीठांना त्यांचा दैनंदिन प्रशासकीय व शैक्षणिक खर्चभागविण्यासाठी 2018-19 या आर्थिक वर्षापासून पुढील पाचवर्षांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा ठोक निधी दरवर्षी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ अधिनियम-2014 मधीलतरतुदींनुसार मुंबईमध्ये 2015-16 पासून, नागपूरमध्ये 2016-17पासून तर औरंगाबाद येथे 2017-18 या शैक्षणिक वर्षापासूनमहाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ सुरु झाले आहे. या विद्यापीठांनात्यांचा दैनंदिन प्रशासकीय व शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी2018-19 या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षे प्रत्येकी पाचकोटी रुपये इतकी ठोक रक्कम दरवर्षी देण्यात येईल. या निधीतूनविधि विद्यापीठांना मंजूर आकृतीबंधानुसार भरलेल्या पदांचे वेतन,कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन आणि अन्य दैनंदिन प्रशासकीय वशैक्षणिक खर्च भागवता येणार आहे.