विधीमंडळाच्या पंचायतराज समितीचा दौरा

0

शिरपूर । सध्या विधीमंडळाच्या पंचायतराज समितीचा धुळे जिल्हा सुरु असुन मंडळ 5 ते 7 धुळे जिल्हा दौर्‍यावर आहेत. यात 6 रोजी आमदारांच्या शिष्ट मंडळाने शिरपूर, शिंदखेडा पंचायत समिती येथे भेट देऊन मागील पंचावार्षीक काळात झालेल्या विकासकामांचा व शासकीय योजनांचा आढावा घेतला. सदर शिष्टमंडळामध्ये गटप्रमुख आ.आर.टी.देशमुख, आ. राजेंद्र नजरधने, आ.कृष्णा गजबे आ.राहूल मोटे व सोबत प्रशासकीय अधिकारी परमेश्‍वर बाबत कक्ष अधिकारी गग्रामविकास विभाग, गिरीश शिंदे प्रतीवेदक व उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांचा समावेश होता. यावेळी पंचायत समिती शिरपूरचे गटविकास अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.या वेळी समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी व मागील काळात सेवा दिलेले प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

योजनांच्या अंमलबजावणीची घेतली माहिती
यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना विभागीय शिष्टमंडळाने स्पष्ट केले की सदर शिष्टमंडळ हे विधान परिषदेच्या आदेशान्वये भेट देण्यास आले असुन या भेटीत जन सुविधा वर आधारीत शासकीय योजना त्यांची झालेली कामे, विकासकामे व योजनांची अंमजलबजावणी योग्यरित्या झाले की नाही, शासकीय निधीचा वापर सकारात्मकदृष्ट्या करण्यात आला की नाही या सर्व मागील पंचवार्षीक वर्षांचा आर्थिक व्यवहाराची तपासणी करणार आहे. सदर ची प्रकिया ही गुप्तपणे करावयाची असुन याचा सुस्पष्ट अहवाल आम्हांस शासनास सादर करावयाचा आहे, असे सांगितले.

शिंदखेड्यात मोर्‍यांची कामे निकृष्ट दर्जांची
शिंदखेडा । तालूक्यातील विवीध विकासकामांची पाहणी पाच सदस्यीय समितीकडून करण्यात आली. समितीतर्फे तालूक्यात करण्यात आलेल्या रस्ता कॉक्रीटीकरण, नाल्यावर तयार करण्यात आलेल्या मोर्‍यांची कामे निकृष्ट दर्जाची झालेली असल्याचे समितीच्या पाहणीत पूढे आल्याची चर्चा आहे. या समितीमध्ये गटप्रमुख मा. आ.अनिल आण्णा गोटे, आ. भिमराव तापगिरे, आ.रमेश बुंदिले, सचिव सचिन बाभळगांवकर, ह्यांचा समावेश होता. बेटावद,पाष्टे, हूंबर्डे, मुडावद, कमखेडा, म्हळसर या भागात झालेल्या कामांची पाहणी समितीने केल्याचे कळते.

पदाधिकार्‍यांची अडीच तास द्वारबंद चर्चा
म्हळसर येथील लघूसिंचन विभागाचा साठवण बंधार्‍यांची पाहणी करण्यात आल्याचे कळते. पंचायत समितीच्या आवारात असलेल्या गट संसाधनकेंद्राच्या इमारतीच्या बंद खोलीमध्ये सुमारे अडीच तास समितीच्या पदाधिकार्‍यांनी विविध विभागाच्या अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. त्यात सन2012-2013 च्या प्रश्नावली क्रमांक 2 वार्षीकमधील शासकप्रश्नावलीतील 28 प्रश्नावलीवर चर्चा करण्यात आल्याचे कळते. त्यात गेल्या आठ दिवसापासून समिती येणार असल्याची चर्चा होती. समितीच्या पाहणीत कोणत्याही उणीवा येवू नये यासाठी कर्मचारी वर्ग सतर्क होता. त्यानूसार आज सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे हावभाव बदल्याचे स्पष्टपणे दिसले. यावरून अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसते. 28 प्रश्नावलीमध्ये जवाहर विहिरी, घरकूल व पेयजल योजना, प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण तसेच समाजकल्याण विभागातील विविध अवजारा संबंधी, पोषण आहार यावर सभागृहात चर्चा झाल्याचे कळते. याबाबत गटप्रमुख आ.अनिल गोटे यांना विचारले असता कोणतीही माहिती देता येणार नाही. माफ करा अशी कुठलीही माहिती देता येणार नाही असे सांगून मार्गस्थ झाले. याप्रसंगी विवीध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अनियमितता करणार्‍यांवर धडक कारवाई
या दरम्यान आढळुन आलेल्या त्रुटी किंवा अनियमीता यांच्यावर थेट कार्यवाही करण्यात येईल. शिवाय विभागीय शिष्ट मंडळाच्या भेटी दरम्यान आलेल्या तक्रारींची देखिल दखल घेऊन त्यावर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल हा संबधितांना महिन्याभरात देण्यात येईल. सदर शिष्ट मंडळास धडक कार्यवाहीचे अधिकार प्रदान केलेले असुन तपासणीत काही गैर प्रकार आढूळुण आल्यास त्यावर योग्य ती कार्यवचाही शिफारस करण्यात येईल. मात्र ही सर्व प्रक्षकया गोपनीय पध्दतीने पार पाडली जाईल. पंचायत राज समितीच्या या भेटीसाठी पंचायत समिती शिरपूर यांनी जय्यत तयारी केली होती. यासाठी महिन्याभरापासुन पेंडींग फाईल पुर्ण करणे, ऑनलाईन नोंदी करणे व अभिलेखांची पुर्तता करणे अशी कामे सुरु होती. आज या शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांनी जैय्यत तयारी केली होती.या साठी पंचायत समिती कार्यालय सुभोभित करण्यात आले होते. यावेळी सदर शिष्टमंडळाने मागील पंचवार्षीक काळातील कामांचा आढावा घेतला. शिवाय विकास कामांना भेट देण्यासाठी त्यांनी शिरपूर तालुक्यातील अर्थे , वाडी व बोराडी येथिल विकासकामांची पाहणी केली. सदर कामकाज व भेटी पुर्ण झाल्यानंतर या आमदार महोदयांनी शिरपूर पर्टनला देखिल भेट दिली. आणी या पुढील कार्यवाही दि.7 रोजी धुळे जि.प. च्या कार्यालयात संपन्न होणार असुन सदर पाहणीचा अहवाल यावर चर्चा होऊन कार्यवाही होणार आहे.

बेटावद येथील कामांवरून ओढले ताशेरे
सकाळी दहा वाजता धुळ्याहून पंचायतराज समितीने आपला मोर्चा शिंदखेडा तालूक्याकडे वळविला आणि समितीने हुंबर्डे-पाष्टे, मुडावद-पाष्टे,कमखेडा-पाष्टे,या रस्त्यांची पाहणी केली. पाष्टे-वारूड रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पाईप मोरीची पाहणी करण्यात आली.बेटावद गावांत आमदार निधीतून झालेल्या शौचालयांची पाहणी करण्यात आली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात झालेले कॉक्रीटीकरणाचे कामावर ताशेरे ओढल्याचे कळते. सदर कामे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे समितीचे म्हणणे असल्याची चर्चा
आवारात होती.