भुसावळ- विनयभंग व पोस्कोच्या गुन्ह्यातील पसार आरोपीच्या शहर पोलिसांनी सोमवारी मुसक्या आवळल्या. इम्रान इमाम पिंजारी (19, रा.भारत नगर भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी गुन्हा घडल्यानंतर पसार झाला होता मात्र तो सोमवारी गवळीवाड्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शंकर पाटील, साहिल तडवी, चंद्रशेखर गाडगीळ, संजय बडगुजर, भूषण चौधरी, जितेंद्र सोनवणे यांनी आरोपीस अटक केली.