पुणे । नऊ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणार्याला 1 वर्ष तुरुंगवास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. जगदीश रामचंद्र पवार (वय 39, रा. भोसरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 28 मार्च 2016 रोजी दुपारी 3 च्या सुमारास गांधीनगर, पिंपरी येथे घडली. याबाबत त्या मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी तीन साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. घटनेच्या दिवशी मुलगी कपडे धूत होती. त्यावेळी पवार याने तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.