जळगाव । मागील भांडणाचा वाद उपस्थित करत बेकायदेशीर गर्दी जमवून शिवीगाळ करून मारहाण केली व दमदाटी केली. हात पकडून अश्लिल हावभाव केल्याप्रकरणी तालुका पोलीसांत परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पहिल्या गटातील अश्विनी दिनेश गुंजाळ (वय-21) रा. वाटीका आश्रम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 3 जून रोजी सायंकाळी मागील भांडणाचा वाद उपस्थित करत बेकायदेशीर गर्दी जमवून शिवीगाळ व मारहाण करुन दमदाटी केली. आरोपी अनिल देवीदास नन्नवरे याने हात पकडून अश्लिल हावभाव करत लज्जास्पद कृत्य केले. आरोपी सुनिल देवीदास नन्नवरे, लिलाबाई देवीदास नन्नवरे, किरण अनिल नन्नवरे, रेखा सुनिल नन्नवरे यांनी देखील शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली. अश्विनी गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात आरोपी अनिल देवीदास नन्नवरे, सुनिल देवीदास नन्नवरे, लिलाबाई देवीदास नन्नवरे, किरण अनिल नन्नवरे, रेखा सुनिल नन्नवरे सर्व रा. वाटीका आश्रमजवळ यांच्या विरोधात भादवी कलम 354, 394, 143, 149, 504, 506, 323, 509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एपीआय देशमुख करीत आहे. यातील आरोपी अनिल नन्नवरे, सुनिल नन्नवरे यांनी सायंकाळी अटक केली आहे.
बेकारदेशीर मंडळी जमवून मारहाण
दुसर्या गटातील फिर्यादी लिलाबाई देवीदास नन्नवरे (वय-56) रा. वाटिकाश्रम येथे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी दिपक सुपडू गुंजाळ (वय-35) रा. वाटीकाश्रम हे फिर्यादीच्या घरासमोर बेकायदेशीर मंडळी जमवून आरोपी दिनेश सुपडू गुंजाळ, हेमराज वसंतराव ढगे, अश्विनी दिनेश गुंजाळ आणि अनुपमा दिनेश गुंजाळ सर्व रा. वाटीकाश्रम यांनी बेकायदेशिरीत्या मंडळी जमवून शिवीगाळ करत मारहाण केली व दमदाटी केली. लिलाबाई नन्नवरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिपक सुपडू गुंजाळ, दिनेश सुपडू गुंजाळ, हेमराज वसंतराव ढगे, अश्विनी दिनेश गुंजाळ आणि अनुपमा दिनेश गुंजाळ यांच्या विरोधात तालुका पोलीसात भादवी कलम 143, 147, 149, 323, 336, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय पी.डी.पाटील हे करीत असून यातील आरोपी दिपक गुंजाळ, दिनेश गुंजाळ आणि हेमराज ढगे यांना अटक केली आहे.