विनयभंग, जुनोना सरपंचपती अटकेत

0

भुसावळ: बोदवड तालुक्यातील जुनोना येथील विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी जुनोना सरपंचांच्या पतीला अटक करण्यात आली. आरोपी हे शिवसेना युवा सेना तालुकाधिकारी असल्याने तालुक्यातील राजकीय गोटात मोठीच खळबळ उडाली आहे. 27 वर्षीय पीडीत विवाहिता 19 रोजी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास आमदगाव रस्त्यावर शौचास गेली असताना संशयीत आरोपी तसेच जुनोना सरपंचांचे पती व शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या सुरेश पुंडलिक पाटील (जुनोना) यांनी दुचाकीवर येत विनयभंग केल्याचा आरोप आहे. आरोपीस बोदवड पोलिसांनी अटक केली. तपास उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.