भुसावळ- बाजारपेठ पोलीस ठाण्यात विनयभंग प्रकरणातील संशयीत आरोपी रमीज खॉ.नईम खॉ (31, रा.शिवाजीनगर, नसरवांजी फाईल, भुसावळ) यास गस्तीवरील बाजारपेठ पोलिसांनी बसस्थानक भागातून मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे हे रात्री गस्तीवर असताना संशयीत बसस्थानकात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज ठाकरे, नाईक यासीन पिंजारी करीत आहेत.