अमळनेर । युवतीच्या घरात घुसून तिचा जबरी विनयभंग केल्याप्रकरणी नागलवाडी तालुका चोपडा येथील आरोपीस तीन वेगवेगवेगळ्या गुन्ह्यात प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवार 17 जानेवारी रोजी सुनावली. चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथील आरोपी योगेश उर्फ भुरा लोटन पाटील याने 11 मे 2015 रोजी पाणी मागण्याच्या नावाने गावातीलच एका 17 वर्षीय युवतीच्या घरात घुसून घरात कोणीही नसल्याने तिच्या मागे जाऊन तिला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध चोपडा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा खटला अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयात चालला. यात 7 साक्षिदार तपासण्यात आले सरकारी वकील आर.बी.चौधरी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. अखेर आलेल्या पुराव्यावरून आणि साक्षीदारांच्या जबाबावरून गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायमुर्ती आर.पी.पांडे यांनी आरोपीस वरील तिन्ही गुन्ह्यात प्रत्येकी 3 वर्ष शिक्षा व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आरोपीस तिन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत.