विनय कटियार यांना समन्स

0

दिल्ली : बाबरी मशीद प्रकरणात सीबीआयवर टीका केल्याबद्दल भाजप नेते विनय कटियार यांना पक्षाने समन्स बजावले आहे. तसेच अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत, असा सल्लाही दिला आहे. बाबरी मशीद पाडण्याचा कट कुणीही रचला नव्हता. या प्रकरणात कोणी कट रचत असेल तर ते सीबीआय आहे. सध्याच्या काळात सीबीआय मोकाट सुटलेल्या हिंस्त्र श्वापदासारखे वागत आहे. मुळात खटला नसतानाही सीबीआयने आमच्याविरुद्ध नवा खटला का रचला? अशी टीका त्यांनी केली होती.