विनाकारण ‘चेन पुलिंग’ : दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून रेल्वेने सात लाखांचा दंड केला वसुल

भुसावळ : विनाकारण धोक्याची साखळीओढ णार्‍या एक हजार 112 प्रवाशांविरूध्द जानेवारी ते मे या महिन्यांच्या काळात रेल्वे सुरक्षा बलाने दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून सुमारे सात लाखांचा दंड वसुल केला आहे. अनेक वेळा काही प्रवासी विनाकारण गाड्यांची धोक्याची साखळी ओढत असल्याने त्यामुळे गाडीला खोळंबा होतो शिवाय पाठीमागील गाड्यांवरही त्याचा परीणाम होत असल्याने याची दखल रेल्वे बोर्डाकडून घेतली जात आहे.

सात लाखांचा दंड वसुल
पाच महिन्याच्या काळात रेल्वे सुरक्षा बलाकडून चेन पुलिंग करणार्‍या 1 हजार 112 प्रवाशंविरूध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात प्रवाशांकडून रेल्वे सुरक्षा बलााच्या जवानांनी सहा लाख 93 हजार 485 रुपयांचा दंड वसूल केला.
प्रवाशांनी विनाकारण गाडीची चेन ओढू नये, असे आवाहर आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना यांनी केले आहे.