विनाकारण फिरणार्‍या चौघांवर कारवाई : ३ दुचाकिसह चारचाकी जप्त

0

एमआयडीसी पोलिसांची इच्छादेवी चौक परिसरात मोहीम

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त विनाकारण बाहेर फिरू नये असे शासनाचे आदेश आहेत . या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या चार जणांवर एमआयडीसी पोलिसांनी रवीवारी कारवाई केली असून त्यांची वाहने जप्त केली आहे .

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील पोलीस नाईक प्रवीण मांडोळे, पोलिस कॉन्स्टेबल इम्रान बेग, संजय धनगर या कर्मचाऱ्यांचे पथक रविवारी दुपारी इच्छादेवी चौक परिसरात बंदोबस्तावर होते. या दरम्यान काही जण वाहनांवरून विनाकारण फिरत असल्याने त्यांच्यावर कर्मचाऱ्यांनी कारवाई केली .

याच्यावर केली क‍ारवाई

एजाज आझाद खाटीक वय ३० रा. सुप्रीम कॉलनी (दुचाकी क्र. एम.एच १९ एल ५४८५), नितीन दयानंद कटारिया वय ३७ रा. संत हरदास हौसिंग सोसायटी , गणेश नगर (दुचाकी एम.एच.१९ बी ई ४८३४), संतोष डोंगरमल जैन वय ४० रा. गायत्री नगर (दुचाकी क्र.एम.एच १९ बीसी ५२४८) व सचिन राजेश जोशी वय ३७ रा. जयनगर (चारचाकी क्र. एम.एच.१९ सीयु ००३७) यांच्यावर कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला असुन वाहने जप्त करण्यात आली आहे.