मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी केली पाहणी; गाळेधारकांवर होणार कारवाई
जळगाव: महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलापैकी असलेल्या गोलाणी मार्केटमध्य विनापरवानगी अंतर्गत बदल करण्यात आल्याची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाली.या तक्रारीची दखल घेवून उपायुक्त अजित मुठे यांनी पथकासह सायंकाळी अचानक पहिल्या मजल्याची पाहणी केली. पाहणी दरम्यान दोन दुकानांचे एक दुकान तसेच अंतर्गत केलेले बदल दिसून आले . तळमजल्यावर सुमारे 67 गाळयांमध्ये बदल केले गेले आहे. वरील मजल्यांवर देखील बदल केले गेले असून गुरुवारी पाहणी करण्यात येणार आहे. दरम्यान, विनापरवानगी बदल केलेल्या गाळेधारकांना कलम 81 ब व क ची नोटीस बजावून कारवाई केली जाणार आहे.
जळगाव महापालिकेच्या मालकीचे शहरात 28 मार्केट आहे. त्यापैकी जळगाव शहरातील मुदत संपलेल्या 18 मार्केटचा मुदत संपलेला असून त्या गाळेधारकांचा अजून प्रश्न मिटलेला नाही. मुदत अजून बाकी असलेल्या मार्केटमधील गोलाणी मार्केटमध्ये अनेक गाळेधारक परवानगी न घेता अंतर्गत बदल, बांधकाम होत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. त्यानुसार उपायुक्त मुठेंनी अचानक गोलाणी मार्केटच्या पहिल्या मजल्याच्या दुकानांची पाहणी केली. यात सुमारे 67 दुकाने विनापरवानगी बदल केल्याचे अढळून आले. यावेळी पाहणी दरम्यान किरकोळ वसुली विभागाचे प्रमुख नरेंद्र चौधरी,गौरव सपकाळे, विधी विभागाचे किरण भोळे, अतिक्रमण निर्मूलन अधिक्षक एच. एम. खान आदी मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.
एक-दोन ठिकाणी वाद
दुकानांची पाहणी करत असतांना एक दोन ठिकाणी गाळेधारकंनी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. कर्मचारी व अधिकर्यांनी नियमांचे उल्लंघनाची माहिती दिल्यानंतर तसेच कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा दिल्यानंतर गाळेधारक नरमले.
दोन गाळ्यांचे एक दुकान
गोलाणीत गाळ्यांची पाहणी करत असतांना दोन दुकानांमधली भिंत तोडून एक दुकान विनापरवागी केल्याचे मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यात दुकानांमध्ये अंतर्गत केलेले बांधकाम, पार्टीशन, असे अनेक प्रकार या पाहणीतून आढळून आले आहे.
81 ब नुसार बजावणार नोटीस
पाहणी दरम्यान विना परवानगी बांधकाम केल्याचे आढळून आलेल्या गाळेधारकांना महापालिका 81 ब नुसार नोटीसा दिल्या जाणार आहे. त्यानंतर महापालिका प्रशासन गाळेधारकांवर कोणत्या प्रकारची कारवाई करायची हे ठरविणार आहे. तसेच नुकसान भरपाईसाठी कलम 81 क ची देखील नोटीस बजावली जाणार असल्याचे उपायुक्त मुठे यांनी सांगितले.