विनापरवाना तलवार बाळगल्याप्रकरणी अटक

0

चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातील लोंजे येथे विनापरवाना तलवार बाळगणार्‍या चाळीसगाव येथील एकास चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी रविावारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अटक केली. त्याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल प्रल्हाद चव्हाण (रा घाटरोड काँग्रेसवाडी चाळीसगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

माहितीच्या आधारावर कारवाई
तालुक्यातील लोंजे येथे 4 मे रोजी लग्न समारंभात चाळीसगाव घाटरोड काँग्रेस वाडीतील अनिल प्रल्हाद चव्हाण (रा घाटरोड काँग्रेसवाडी चाळीसगाव) याच्या हातात तलवार होती अशी गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना मिळाल्यावरुन त्यांच्या आदेशावरुन रविवारी लोंजे येथे स पो नि दिपक बोरसे, हवालदार शशिकांत महाजन, पोलीस नाईक गणेश चव्हाण, विनोद भोई, पो कॉ गोकुळ सोनवणे यांनी जावुन विनोद नामदेव राठोड याचे राहते घरात असलेला अनिल प्रल्हाद चव्हाण (42) यास दुपारी बाहेर बोलावुन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे त्याच्या पाठीमागील बाजुस शर्टाच्या आत 800 रुपये किमतीची लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळलेली विनापरवाना तलवार मिळुन आली. त्यास तलवारीसह ताब्यात घेतले असुन पो कॉ गोकुळ सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिपक बोरसे करीत आहेत.

रेल्वे पुलावरुन पडुन वृद्धाचा मृत्यू
मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील बापूराव साळुंखे ( वय 64) चाळीसगाव मार्गे मेहुणबारे येथे घराकडे परतताना रविवारी दुपारी मोटारसायकलवरुन तोल जावुन रेल्वे उड्डाणपुलावरुन खाली पडून मृत्यूमुखी पडले.