चाळीसगाव । शहरातील पवार वाडी भागात 9984 रुपये किमतीची संत्रा देशी दारु ताब्यात बाळगुन चोरटी विक्री करणार्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून 12 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पोलीसांनी छापा मारल्यानंतर आरोपी मात्र फरार झाला आहे. चाळीसगाव शहरातील पवार वाडी भागात एका घराच्या कंपाऊंडमध्ये विनापरवाना संत्रा देशी दारु कब्जात बाळगुन चोरटी विक्री होत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलीसांना मिळाल्यावरुन पो नि रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि विजयकुमार बोत्रे, हवालदार शशीकांत पाटील, पो कॉ बापु पाटील, राहुल पाटील, गोपाल भोई, संदीप भोई यांनी 12 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पवार वाडी भागातील सनी गोविंदराव किनडा यांच्या घराच्या कंपाउंड मध्ये छापा मारून कारवाई केली आहे.