जळगाव । रायसोनीनगरातून चोरट्या मार्गाने विनापरवाना वाळूची वाहतूक करणार्या डंपरचालकावर सोमवारी सायंकाळी पकडून कारवाई करण्यात आली. दरम्यान, चालकावर वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायसोनी नगरातून सोमवारी सायंकाळी डंपर (एमएच.19.सीवाय. 9171) ने अवैधरीत्या वाळू वाहतूक करीत असल्याची तलाठी मनोहर शिवराम बाविस्कर यांना माहिती मिळाली होती. त्यांनी रायसोनी नगरातून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपरला अडवून वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता चालक सतिष सकाराम कोळी (रा.खेडी खुर्द) याच्याकडे परवाना आढळून आला नाही. तर पंधराशे रुपयांची अवैध वाळु डंपर मध्ये मिळून आली. या प्रकरणी डंपर आणि चालकाला रामानंदनगर पोलिसांकडे सुपूर्त केले आहे.