विनाशकारी उल्कांच्या टक्करीपासून पृथ्वीचे रक्षण होणार

0

न्यूयॉर्क – अंतराळातून पृथ्वीला टक्कर देण्यासाठी आलेल्या अजस्त्र उल्का पृथ्वीवरील जीवन सहज संपवू शकतात. त्यांची भीती बाळगण्याचे कारण नाही. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने नासाने फ्रिझ एवढ्या आकाराचे अंतराळ यान तयार केले असून ते उल्कावर धडकवून तिची कक्षा बदलण्यास भाग पाडणार आहे. या यानाचा वेग बंदुकीच्या गोळीपेक्षा नऊपट जास्त असेल.

उल्कांना विचलित करण्याचे तंत्र डार्ट या नावाने ओळखले जाते. डार्टला आपलं काम दाखविण्यासाठी एक उल्का असेल ती ऑक्टोबर २०२२ आणि पुन्हा २०२४ मध्ये पृथ्वीजवळ येईल. डार्टच्या गतीजन्य परीणामांमधुन उल्का आपली कक्षा बदलेल. याने मानवी जीवन तसेच जीवसृष्टीवर होणारे दुष्परीणाम टळतील, असे लिंडले जॉन्सन हे नासाचे अधिकारी म्हणतात.

डार्टचा वापर करायचा आहे अशी उल्का आहे अवकाशात आहे. तिला डीडीमॉस (ग्रीक मध्ये जुळे) नाव आहे. डीडीमॉस ए भाग ७८० मीटर आहे तर डीडीमॉस बी १६० मीटर लांबीचा आहे. डार्टचे लाँचिंग २०२० मध्ये होईल आणि तेव्हा डिडीमॉस बी वर अंतराळयान धडकवले जाईल.

डार्ट लाँच झाल्यावर डीडीमॉसकडे जाईल. तिच्यातील स्वयंचलित क्षेपण तंत्र डिडीमॉस बीवर निशाणा साधेल. डार्ट यानाचा वेग सहा किलो मीटर प्रति सेकंद असेल. त्याने उल्काची कक्षा बदलेल. पृथ्वीवरील वेध केंद्रे उल्कांच्या कक्षा बदलाचा आणि त्यांच्यावरील परीणामांकड लक्ष ठेऊन असतील. अँडी चेंग यांच्या मते डार्ट ही भविष्यातील भयंकर उल्कापातावर उपाययोजना आहे.