विना अनुदानित महाविद्यालयाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक- तावडे

0

चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक – विनोद तावडे

नागपूर : राज्यातील कायम विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढण्याबाबत लवकरच बैठक घेवून चर्चा करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य श्री.विक्रम काळे यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. श्री.तावडे म्हणाले, सन 2001 पूर्वीच्या काही कायम विना अनुदानित तत्वावरील विधी शाखेच्या महाविद्यालयात 1995-96 तर पारंपरिक महाविद्यालयांना 1997-98पासून कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता देण्यात आली आहे. राज्यामध्ये 2001 पूर्वी कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या महाविद्यालयांची संख्या 63 असून त्यांना अनुदान देण्याची बाब तुर्त विचाराधीन नाही, असे श्री.तावडे म्हणाले.