विना अनुदानित शाळा कृती समितीचा आज विधानभवनावर मोर्चा

0

पनवेल- 1 व 2 जुलै पात्र शाळांना अनुदान देणे, अघोषित असणार्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या  अनुदानासह घोषित करणे. 20 टक्के अनुदान घेतलेल्या शाळांना सामावून घेणेबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता व्हावी म्हणून आळंदी ते मुंबई सायकल अनुदान वारी शनिवारी, 22 जुलै रोजी आळंदीपासून सकाळी 11 वाजता सुरुवात झाली असून बुधवारी 26 जुलै रोजी आझाद मैदान येथे ही सायकलवारी धडकणार आहे. बॉक्सशासनाने गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान शाळांवर खूप मोठा अन्याय केला असून, अनेक वेळा आश्वासने देवूनही 1 व 2 जुलैच्या शाळा अनुदानापासून वंचित राहिलेल्या आहेत. अनेक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा घोषित होण्यासाठी प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत.

तसेच 20 टक्के अनुदान घेतलेल्या शाळांना पुढील प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याबाबत शासनाने कोणताच निर्णय घेतलेला नाही. तसेच 59 लोकांवरील उर्वरित सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच 20 टक्के अनुदान पात्र शाळेतील अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना सामावून घेण्यात यावे या व अशा अनेक मागण्या महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्या आहेत. त्यासाठी ही सायकल वारी काढली असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले. या रॅलीमध्ये मुंबई विभागीय अध्यक्ष प्रशांत रेडीज, कार्यवाहक अरुण मराठे, उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, विभागीय अध्यक्ष सुनील कल्याणी, राज्य सदस्य गजानन काटकर, पुणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, कार्याध्यक्ष आर. झेड. बावीस्कर, संघटक पुंडलिक रहाटे, सचिव प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष उदय देशमुख, सहसचिव गोरख कुळघर, मराठवाडा कार्याध्यक्ष वैजनाथ साठे, सहभागी झाले आहेत.