विना तिकीट प्रवाश्याची वाहकाला धक्काबुक्की

0

जळगाव । राज्य परिवहन महामंडळाच्या धानोरा-जळगाव बसमध्ये रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास विनातिकीट प्रवास करणार्‍यांना वाहकाने जाब विचारला. त्यावेळी त्यांनी वाहकाशी वाद घालून धक्काबुक्की केली. त्यामुळे बस थेट जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणली होती. मात्र या प्रकरणी कोणीही तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही. जळगाव आगाराची बस (क्र. एमएच-20-डी-8718) शनिवारी दुपारी धानोरा येथून जळगावकडे येत होती. त्यावेळी बस मधील दोन प्रवाशांनी तिकीट काढलेले नव्हते. बसचे वाहक अनिल येवले यांनी त्याचा जाब विचारला. त्याचा राग आल्याने काव्यरत्नावली चौकात दोन्ही प्रवाशी आणि त्यांच्या नातेवाईकांनी येवले यांच्या वाद घालून धक्काबुक्की केली. त्यानंतर बस चालक चंद्रकांत सुरळकर यांनी बस थेट जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणली. पोलिस ठाण्याच्या आवारातही जोरदार वाद झाला. मात्र या प्रकरणी कोणीही तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही. मात्र बस मधील उर्वरीत प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

दुचाकी अपघातात दोघे जखमी
जळगाव । दुचाकी स्लिप झाल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दोघे जखमी येथील दौलतनगरमधील रविवासी आहेत. अर्जुन गोविंदा वाघेला (25), राजेश किसन वाघेला (35) दोन्ही रा. दौलतनगर अशी जखमींची नावे आहेत. घटना घडल्यावर दोघे जण दुचाकीवरून पडल्याने त्यांना दुखापत झाली. साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघा जखमींना 04.30 वाजता सिव्हीलमध्ये हलविले. दोघांवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. तसेच गेल्या काही महिनांपासून रस्ता अपघातात जखमी व मृत होण्याच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे.