जळगाव । शहरातील रस्त्यांच्या बाजूला तसेच रस्त्याच्या मधून भूमीगत मोबाईल कंपनीतर्फे केबल टाकण्याचे काम पावसाळ्यात बंद करण्याचे आदेश देवून देखील सुरू होते. याबाबत महापालिकेने विना परवाना खोदलेल्या जागांची पाहणी करून त्याचा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल रामानंद पोलिसांना दिला असून लवकरच याबाबत कंपनीवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागातून मिळाली आहे. शहरात मोबाईलच्या भूमीगत केबल टाकण्यासाठी महापालिकेला रिलायंस जिओ, भारती एअरटेल कंपनीने परावनगी मागितली होती. त्यानुसार मनपा प्रशासनाने दोन्ही कंपनीकडून बँक गॅरंटी तसेच रनिंग मिटर प्रमाणे अनामत रक्क्म घेवून परवानगी दिली होती. त्यात रस्त्याच्या बाजूने, खोदलेले खड्डे पुन्हा रस्त्याच्या लेव्हलने ते डांबरीकरण किंवा क्रॉकीटने बुजवीण्याच्या अटी शर्ती नूसार परवानी दिली होती. तसेच कंपनीने अटी शर्ती देखील मान्य करून कामाला सुरवात केली होती. मात्र प्रत्यक्षात कंपनीच्या ठेकेदारांकडून शहरात अटी शर्तीकडे दूर्लक्ष करून अनेक ठिकाणी रस्ते खोदले पण ते व्यवस्थित न बुजवीता तसेच डांबरीकरण न करता तसेच सोडून दिले होते. तसेच आयुक्त जीवन सोनवणे यांनी पावसाळ्याचे चार महिन्याचे हे काम बंद ठेवण्याचे तसे आदेश दिले होते.