भुसावळ : शहरातील पीओएच कॉलनी, हनुमान मंदिराजवळील 15 बंगला परीसरात गणपती मंडळापुढे विना परवाना डीजे वाजवून गोंधळ निर्माण केल्याप्रकरणी अनोळखी विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, चालक एएसआय तस्लीम पठाण, होमगार्ड विजय कांबळे हे गस्तीवर असताना 19 रोजी मध्यरात्री एक वाजता पंधरा बंगला भागातील काल साम्राज्य मित्र मंडळात विना परवाना डीजे वाजवला जात असल्याची तक्रार आल्याने पोलिसांच्या पथकाने धाव घेतली असता संबंधिताकडे मंडळ स्थापनेचा परवानगी देखील नसल्याचे निष्पन्न झाले. एएसआय तस्लीम पठाण यांच्या फिर्यादीनुसार अनोळखीविरोधात बाजारपेठ पोलिसात भादंवि 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.