चाळीसगाव । विनापरवाना देशी दारुच्या 32 बाटल्या जवळ बाळगल्याप्रकरणी रविवारी 30 रोजी रात्री 9-30 वाजेच्या सुमारास एकास चाळीसगाव शहर गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेवुन त्याच्यावर कारवाई केली आहे.
शहरातील हॉटेल संगम समोर टपरीच्या आडोशाला एक जण देशी दारु बाळगुन असल्याची माहिती मिळाल्यावरुन शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे हवालदार बापूराव भोसले, पोलीस कॉन्स्टेबल नितीन पाटील, विकास पाटील, संभाजी पाटील यांनी छापा मारुन टपरीच्या आडोशाला 1 हजार 664 रुपये किमतीच्या 32 टँगो पंच देशी दारूच्या बाटल्या बाळगून असणार्या आरोपी संदीप शरद जाधव 24 राहणार खरजई रोड चाळीसगाव यास ताब्यात घेतले. त्याच्यावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला 65 ई प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन तपास हवालदार बापूराव पाटील करीत आहेत.