भुसावळ : शहरातील अशोक नगर भागात संशयीत आरोपी कैलास होलाराम सचदेव (45, रा.अशोक नगर, भुसावळ) हा मंगळवारी रात्री 9.45 वाजता बेकायदा दारूची वाहतूक करताना आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. संशयीताच्या ताब्यातून 900 रुपये किंमतीच्या 15 बाटल्या जप्त करण्यात आल्या. तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहेत.