विना परवाना वाळू वाहतूक भोवली ; डंपरसह चालकास अटक

0

भुसावळ- जिल्ह्यातील वाळू उपश्याची ठेक्याची मुदत संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू सुरू असून बाजारपेठ पोलिसांनी अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्‍या डंपर चालकासह वाहनास अटक केली आहे. जयवंत अरुण पाटील (26, रा.साकेगाव, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शनिवारी आरोपी डंपर क्रमांक (एम.एच.19 झेड.3513) अवैधरीत्या वाळूची वाहतूक करीत असताना बाजारपेठ पोलिसांनी वाहनासह चालकास ताब्यात घेत बाजारपेठ पोलिसात आणल्यानंतर 10 लाख 12 हजार रुपये किंमतीच्या डंपर जप्त करण्यात आला असून आरोपीविरूद्ध वाळू चोरी तसेच पर्यावरण प्रदूषण अधिनियम कलम 15 प्रमाणे तलाठी धनेश्वर लोटू पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय तस्लिम पठाण, हवालदार सुनील जोशी, कॉन्स्टेबल विकास सातदिवे आदींच्या पथकाने केली.