चाळीसगाव । शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या हॉटेल आशिष जवळ विनापरवाना विदेशी दारूची चोरटी विक्री करतांना एकास चाळीसगाव शहर पोलिसांनी 10 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास 13 हजार 950 रुप्याच्या विदेशी दारूसह अटक केली आहे. शहरातील मालेगाव रोड वरील हॉटेल आशिषच्या बाजूला विदेशी दारूची विनापरवाना विक्री होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी एक पथक तयार करून छापा मारण्याची तयारी केली आहे.
अवैधरित्या दारू विक्री करतांना केली कारवाई
शहर पोलिस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांना मिळाल्यावरून त्यांच्या आदेशाने पोउनि युवराज रबडे, हवालदार शशिकांत पाटील, कॉन्स्टेबल गोपाल बेलदार, गोवर्धन बोरसे, बापू पाटील, संदीप भोई यांनी छापा मारून हॉटेल आशिष जवळ विनापरवाना बेकायदेशीर रित्या विदेशी दारू बाळगून तिची चोरटी विक्री करतांना आरोपी प्रशांत अर्जुन राजपूत रा शाळा क्र 1 जवळ गांधीचौक चाळीसगाव यास ताब्यात घेतले असून त्यांचेकडून 1900 रु किमतीच्या बॅगपायपर किमतीच्या 27 बाटल्या 2310 रु रॉयल स्टॅग 14 बाटल्या, 3780 च्या डीएसपी ब्लॅक 28 बाटल्या, 3935 च्या आयबीच्या 29 बाटल्या, रॉयल चॅलेंज असे एकूण 13 हजर 950 रुपयाचा विदेशी दारूचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.