विना विलंब शुल्क लागत दीपनगर प्रकल्पाने रीकामे केले एक हजार रेल्वे रॅक

0

भुसावळ- दीपनगर प्रकल्पाने सप्टेंबर 2018 पासून तब्बल एक हजार रेल्वे रॅक वेळेत विना विलंब शुल्काने रीकामे करीत कोट्यवधींची बचत केली. 56 हजार 967 रेल्वे वॅगन अर्थात 38 लाख 23 हजार 595 मेट्रीक टन कोळसा वेळेत रीकामा करून महानिर्मितीचा तब्बल सव्वा ते दीड कोटींचा विलंबाशुल्कापोटी होणारा खर्च वाचवण्यात आल्याने दीपनगर केंद्राने महानिर्मितीच नव्हे तर देशातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात अव्वल स्थान मिळवून विक्रम स्थापीत केला आहे.

विलंब शुल्कात कोट्यवधींची बचत
राज्यात दुष्काळी स्थिती व कडाक्याने उन्हाळ्यामुळे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे औष्णिक केंद्रांतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होणे अपेक्षीत असते. यासाठी इंधन असलेल्या कोळशाचा पुरवठाही तितकाच महत्वाचा असतो. दीपनगर केंद्राला दररोज 16 हजार मेट्रीक टन कोळसा लागतो. रेल्वेच्या वॅगनव्दारे येणारा कोळसा रॅक ठरावीत वेळेत रीकामे करुन रेल्वेला परत द्यावे लागतात. हे रेल्वेचे रॅक वेळेत परत दिले नाहीत, तर रेल्वे प्रशासन महानिर्मितीकडून विलंब शुल्क आकारते. दीपनगर केंद्राने वर्ष 2017-18 मध्ये 1 कोटी 31 लाख 50 हजार रुपये तर वर्ष 2018 -19 मध्ये 21 लाख 40 हजार रुपये विलंब शुल्क रेल्वेला भरले आहे. रेल्वेला नाहक भरावा लागणारा या दंडाची रक्कम वाचावी म्हणून दीपनगर केंद्राने व्यापक नियोजन केले. सप्टेंबर 2018 पासून आतापर्यंत सलग नऊ महिने एक हजार रेल्वे वॅगन विना विलंब शुल्काने वेळेत रीकाम्या करुन रेल्वेच्या स्वाधीन करण्यात आल्या. यामुळे किमान सव्वा ते दीड कोटी रुपयांचा रेल्वेकडून लावण्यात येणारा विलंब शुल्कापोटीचा दंड वाचविण्यात आला आहे. यामुळे दीपनगर केंद्र एमओडीपासून वाचले.