नवी दिल्ली । भारताच्या विनेश फोगटला आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. किर्गिस्तानमध्ये झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल प्रकारात चीनच्या चून लेई हिने अंतिम फेरीत विनेशला 3-2 असे नमवले.
सुरुवातीला विनेश 0-1 अशी मागे पडली होती. यानंतर तिने दोन गुण घेत जोरदार पुनरागमन केले. दोन मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना चूनने दोन गुण घेत आघाडी घेतली आणि ही आघाडी कायम राखून सुवर्णपदक मिळवले. महिलांच्या 59 किलो गटात भारताच्या संगीताने कोरियाच्या जियून उमला पराभूत करून ब्राँझपदक मिळवले.