राज्यस्तरीय विनोदी काव्यवाचन स्पर्धा उत्साहात
पिंपरी : आज समाजात ताण-तणाव वाढत आहे. त्यावर हसण्यासारखा उपाय नाही. विनोदी कवितांनी ते साध्य होते. परंतु विनोदी कविता लिहिणे कठीण काम आहे. त्यासाठी सूक्ष्म निरीक्षण आवश्यक आहे. विनोदी काव्यवाचन स्पर्धेचा हा राज्यातील एकमेव प्रयोग आहे. हा असाच सुरू रहावा, असे मत ज्येष्ठ हास्यकवी बंडा जोशी यांनी केले. युवाचैतन्य प्रतिष्ठान व विदर्भ सहयोग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ भवन निगडी येथे राज्यस्तरीय विनोदी काव्यवाचन स्पर्धा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ सहयोग मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. दिगंबर इंगोले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भालचंद्र कोळपकर, पिंपरी-चिंचवड मसाप अध्यक्ष राजन लाखे, साहित्यिक अरुण बोर्हाडे, संभाजी बारणे, हेमंत जिड्डेवार, सुरेश कंक आदी उपस्थित होते.
सहभागी कवींचा सन्मान
काव्यवाचन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम रज्जाक शेख, द्वितीय विजया देव, तृतीय डॉ. विजयकुमार माने, उत्तेजनार्थ जयवंत पवार, प्रमोद येवलेकर, नरहरी वाघ यांचा समावेश होता. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. पितांबर लोहार आणि अॅड. अंतरा देशपांडे यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. प्रत्येक सहभागी कवीचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांची मनोगते तसेच काव्यवाचन झाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक नीलेश म्हसाये यांनी केले. सूत्रसंचालन तानाजी संकपाळ यांनी केले. आभार वैभव टेकाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिरुद्ध काळे, दीपक धुमाळे, संतोष माळी, मिलिंद येरोकार, सुनील चोरे, विलास महल्ले, अॅड. हर्षद नढे, शारदा म्हसाये, विनिता मगर यांनी परिश्रम घेतले.