लंडन । इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटर केविन पीटरसरन याला जेलची हवा खावी लागली आहे. हे प्रकरण थोडे जुने आहे पण याची माहिती स्वतः पीटरसन याने आता दिली आहे.पीटरसन याने आपल्या अटकेची बातमी ट्विटरवर शेअर केली. पोस्ट झाल्यावर ही बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. अनेक वर्तमानपत्र आणि टीव्ही न्यूज चॅनलमध्ये ही मुख्य बातमी होती. पीटरसनने जिनिव्हा एअरपोर्टवर गोल्फ स्टीक फिरवली होती. हा कायद्याचा भंग आहे. त्यामुळे या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे पीटरसनला एअरपोर्टच्या जेलमध्ये काही काळासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर पीटरसनने ट्वीट करून सांगितले की, आज जिनिव्हा एअरपोर्टमध्ये बंद आहे, ही मस्करी नाही. गोल्फ स्टीक एअरपोर्टमध्ये फिरवल्याने मला अटक करण्यात आले आहे. दरम्यान काही काळानंतर पीटरसनला सोडण्यात आले.
पीटरसनने इंग्लिश क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने काउंटी क्लब सरेकडून आपला शेवटचा सामना खेळला होता. पीटरसन याने 104 टेस्टमध्ये 47.28च्या सरासरीने एकूण 8 हजार 181 धावा काढल्या. आपल्या करिअरमध्ये 23 शतक आणि 35 अर्धशतक बनविले. वन डेमध्ये 136 सामने खेळले त्यात 9 शतक आणि 25 अर्धशतक कर 40.73च्या सरासरीने 4440 धावा केल्या.