विपुल कांबळे,चिन्मयी पुरव स्व. डॉ कडूसकर ओम अर्वाड तर नेहा खडके,शेख शाहीमा स्व. वासुदेव पाटील पुरस्काराने सन्मानित
जळगाव – डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालात वार्षिक पारीतोषीक वितरण समारंभ नुकताच संस्थचे अध्यक्ष माजी खा डॉ. उल्हास पाटील, अधिष्टाता डॉ. एन आर्विकर यांचे हस्ते स्व. उल्हास कडूसकर यांचा ओम अवार्ड, स्व. वासुदेव पाटील आणि डॉ नागेंद्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ स्व. डॉ उल्हास कडूसकर यांचे नावे गेल्या ५ वर्षापासून ओम अर्वाड उकृष्ट विदयार्थी व विदयार्थीनीला दिला जात असून यावर्षी विपुल विजय कांबळे तर मुलींमधून चिन्मयी संजय पुरव यांना रोख ५०००/— प्रमाणपत्र व मानचिन्ह देउन गौरवण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ स्व वासुदेव पाटील पुरस्कार नेहा अनीलकुमार खडके आणि शेख शाहीमा वसीम अहमद यांना सयुक्तपणे रोख २५००/— व प्रमाणपत्र अश्या स्वरूपात प्रदान करण्यात आला.तर डॉ नागेंद्र पुरस्कार उकृष्ट मायक्रोबॉयोलॉजी विदयार्थी म्हणून रोख अनुक्रमे ३०००/—व २०००/— आणि प्रमाणपत्र अश्या स्वरूपात भारती भगवान राजपाल आणि निती नाव्याश्री मोरोमॅटी यांना प्रदान करण्यात आला.यशस्वी विदयार्थ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्यात.
विदयार्थ्यांच्या प्रतिभाशक्तीला वाव देण्यासाठी पुरस्कार — अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर
हुशार विदयार्थ्यांच्या प्रतिभाशक्तीला वाव देण्यासाठी गेल्या ५ वर्षापासून सतत या पुरस्काराचे वितरण केले जात असल्याचे अधिष्टाता आर्विकर यांनी सांगीतले. पुढे बोलतांना वैद्यकिय क्षैत्रात प्रतिभावान डॉक्टर तयार करण्यासाठी असे पुरस्कार महत्वाची भुमिका निभावत असल्याचे सांगीतले.
स्व. डॉ उल्हास कडूसकर यांच्या आठवणी जागृत आहे — माजी खा.डॉ उल्हास पाटील
जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ स्व. डॉ उल्हास कडूसकर सर हे माझे गुरू होते. ५ वर्षापुर्वी त्यांनी सूरू केलेेली परंपरा अखंडीत ठेवत हा त्यांच्या आठवणी या पुरस्काराच्या रूपाने कायम जागृत राहतील. त्यांच्या आदर्शावर पाउल ठेवून माझी व गोदावरी फॉउंडेशनची वाटचाल देखिल अविरत सूरू राहणार असल्याचे माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी सांगितले.