मुंबई । विफा स्किलनेशन आयोजित फुटबॉल मॅनेजर्स पदविका परिक्शेत 48 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने मान्यता दिलेला फुटबॉल मॅनेजर्स हा देशातील पहिला अभ्यासक्रम आहे. नैवेद्य परमार्थ आणि भव्य जैन हे संयुक्तरित्या या परिक्शेत सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
तर हिमांशू शर्मा आणि डानाटो पावये रौप्यपदकाचे मानकरी ठरले. याशिवाय ट्रेवर फर्नांडेस, आनंद शिवदास, अंशुमन नारायण, सूर्यप्रकाश आणि लिन्डान डिपेन्हा कांस्यपदक विजेते ठरले. परिक्शेच्या निकालाआधीच यातील अनेक उमेदवारांना जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स, बेंगळुरू एफ सी, मुंबई एफसी, विफा, बायचुंग भुतिया फुटबॉल स्कुल आणि एचयुडीएल आदी संस्थानी आपल्या सेवेत सामावून घेतले आहे.