बोदवडसह रावेर व मुक्ताईनगर शहरात राज्य शासनाच्या कृतीचा निषेध ; प्रशासनाला निवेदन
रावेर/बोदवड- शासन व सत्ताधारी पक्षाच्या असंवेदनशील कारभारामुळेच विखरणचे शेतकरी स्व.धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर रावेर येथे बुधवारी राष्ट्रवादी तालुका काँग्रेस पक्षाने घटनेचा निषेध करीत नायब तहसीलदाराला कविता देशमुख यांना निवेदन दिले तर बोदवड येथेही इंधन दरवाढीविरोधात नायब तहसीलदार बी.डी.वाडीले यांना निवेदन देण्यात आले.
रावेरला राष्ट्रवादी आक्रमक
माजी आमदार अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, संभाजी बिग्रेड तालुकाध्यक्ष विलास ताठे, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण मोपारी, तालुका युवक उपाध्यक्ष विनोद चौधरी, सीताराम पाटील, जिजाबराव पाटील, केदारनाथ पाटील, कलेश महाजन, भाऊराव तायडे, शेख मेहमूद यांच्यासह मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते
उपस्थित होते.
बोदवड येथे नायब तहसीलदारांना निवेदन
बोदवड तालुका कॉँग्रेस कमेटीतर्फे विरेंद्रसिंग पाटील यांच्या नेत्रृत्वात विविध मागण्यांसंदर्भात नायब तहसीलदार बी.डी वाडीले यांना निवेदन देण्यात आले. देशभरात इंधन दरात प्रचंड प्रमाणात वाढ तसेच बोदवड परिसरातील बोंडअळी ग्रस्त शेतकर्यांना त्वरीत मदत मिळावी, शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, शहर व ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करावी, पिंगलवाडे तलाठी पाटील यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ जिल्हाभरात काम बंद आंदोलन सुरू असताना शासन बेदखल असल्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आल्या. प्रसंगी बोदवड कॉँग्रेस शहराध्यक्ष मेहबूब शेख, नगरसेवक पती आनंदा पाटील, तानाजी पाटील, त्र्यंबक पाटील, रणजीत मोरे, बाबूराव बढे, अजय गवळे ,बापू देशमुख, देवसिंग पाटील, आधार पाटील, युवक कॉँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष भूषणसिंग पाटील, तालुकाध्यक्ष अमोल राजपूत, सचिव सचिन पाटील, साहेबराव पाटील, भगवान सूर्यवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
मुक्ताईनगरात धरणे
मुक्ताईनगर- पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तालुका काँग्रेसने तहसीलसमोर धरणे आंदोलन केले. तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष एस.ए.भोइ, आसीफखान इस्माईल खान, संजय पाटील, प्रभाकर पाटील, प्रा.सुभाष पाटील, शरद महाजन, लक्ष्मण पाटील, बी.डी.गवई, आलम शाह, अरविंद गोसावी, शकील आझाद, अतुल जावरे, गोपालसिंग पाटील, पंडित काळे, सतीश पाटील, नामदेव वाडेकर, आर.के.गणेश, सुरेश चौधरी, विनोद महाजन इ. सहभागी झाले.