विभागीयस्तरावर-फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत योगेश मधुकर जाधवने पटकवला प्रथम क्रमांक

भडगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील गाळण बु.येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वसंतराव नाईक माध्य व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा, गाळण बु.पाचोरा जि. जळगाव येथील 12 वी कला (आर्टस) शिकणारा विद्यार्थी 20 सप्टेंबर-2003 रोजी, चाळीसगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रिस्टाईल ६५ किलो गटातील कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला. तसेच त्याने विभागीय स्तरावर 24 सप्टेंबर 2023 रोजी 19 वर्ष वयोगटात ६५ किलो वजनी गटातून नाशिक जिल्हयातील येवला येथे विभागीय स्तरातल्या फ्री स्टाईल स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळविला असून राज्य स्तरावर निवड झालेली आहे. योगेश जाधव याला ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक वाल्मिक अरुण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश देवराम पाटील, ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक व शिक्षकेत कर्मचारी व माध्यमिक शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे हार्दिक अभिनंदन केले.