विभागीय रेल्वे सल्लागार समितीवर अनिकेत पाटील यांची निवड

0

भाजपाच्या पदाधिकार्‍यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

भुसावळ- भुसावळ विभागीय रेल्वे सल्लागार समितीवर सदस्य म्हणून भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिकेत सुधीर पाटील यांची निवड करण्यात आली. आगामी दोन वर्षाच्या कालावधीसाठी ही निवड असून खासदार रक्षा खडसे यांच्या शिफारसीनुसार डीआरएम आर.के.यादव यांनी सोमवारी पाटील यांना नियुक्तीपत्र दिले. माजी नगरसेवक तथा डीआरयुसीसी सदस्य परिक्षीत बर्‍हाटे यांच्या रिक्त जागेवर ही निवड करण्यात आली आहे.

निवडीनंतर अनिकेत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या माध्यमातून रेल्वेकडून सर्वसामान्य प्रवाशांना दिल्या जाणार्‍या सोयी, सुविधा आदींबाबत सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा होते. प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी ही समिती महत्वाची भुमिका घेते. भुसावळ रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण, सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेर्‍यांची संख्या वाढविणे, रेल्वेच्या जनरल डब्यांजवळ पिण्याच्या पाण्याची नळ आणि जनता खाना मिळेल, अशी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्याचे अनिकेत पाटील यांनी ‘दैनिक जनशक्ती‘शी बोलताना सांगितले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदावरुन त्यांचा शहर आणि विभागात अफाट जनसंपर्क आहे. यामुळे सदस्य पदाला पाटील यांच्या माध्यमातून योग्य न्याय मिळणार आहे. या निवडीबद्दल माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, भाजपचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी आदींनी स्वागत केले आहे.