विभाग प्रमुखांना न विचारता 14 लिपिकांच्या बदल्या

0

प्रभाग समिती क्र.1 पाच लिपिकांची बदली करुन त्याऐवजी दिले तीन लिपीक


जळगाव– मनपाच्या वेगवेगळ्या विभागातील 14 लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र लिपिकांच्या बदल्या करतांना विभागप्रमुखांना विश्वासात न घेता कामात पारंगत आणि संगणक कामाची गती असलेल्या कर्मचार्‍यांची बदली करण्यात आल्याने विभागप्रमुखांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान,उपायुक्त अजित मुठे यांनी बदलीचे आदेश दिले आहे.

मनपाच्या वेगवेगळ्या विभागातील 14 लिपिकांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. यात प्रभाग समिती क्रमांक 1 मधील सबोध तायडे,समाधान चौधरी,अंकुश गवई,संतोष कोल्हे,भोजराज काकडे,प्रभाग समिती क्रमांक 2 मधील संजय खडके,नरेंद्र कोळी(वार्डबाय), प्रभाग समिती क्रमांक 3 मधील नितीन जैन, प्रभाग समिती क्रमांक 4 मधील विलास माळी,राहुल पवार,आस्थापना विभागातील खादीक इकबाल,भानुदास वानखडे,अर्थ विभागातील किशोर अटवाल,मलेरिया विभागातील वाहन चालक साहेबराव शंखपाळ या कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

बदली रद्द केल्यास कारवाईचा इशारा

मनपा कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून आदेश मिखाल्यानंतर तात्काळ संबंधित विभागातून कार्यमुक्त करण्यात यावे.तसेच बदलीच्या ठिकाणी रुजू होवून अहवाल सादर करावा असेही उपायुक्त मुठे यांनी आदेशात म्हटले आहे. कोणत्याही कर्मचार्‍याने बदली रद्द करण्यास दबाव आणल्यास कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

प्रभाग समिती 1 मधील संगणक चालक कर्मचार्‍यांच्या बदल्या

मनपा हद्दीतील प्रभाग समिती क्रमांक 1 मधील जवळपास 35 ते 40 हजार मिळकतींचे फेरमूल्यांकन करुन सुनावणी घेण्यात येणार आहे.त्याबाबतचे काम सुरु आहे.तसेच मालमत्ता कर आकारणी संगणकीकृत करण्यात येणार आहे. परंतु या विभागातील पाच लिपिकांची बदली करण्यात आली आहे.त्यामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. पाच कर्मचार्‍यांची बदली करुन त्यांच्या ऐवजी केवळ तीन कर्मचारी देण्यात आले आहेत.