पुणे । विमलाबाई गरवारे प्रशालेत शिक्षक दिन मोठ्या दिमाखात साजरा केला गेला. त्यानिमित्त अर्चना लडकत, अपर्णा कुलकर्णी, आशा दळवी, ज्योती इनामदार यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले गेले. तसेच मेघना देशपांडे यांना उपक्रमशील शिक्षिका व राजेंद्र पावरा यांना तंत्रस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अरुण देवस्थळे व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. शाळा समिती अध्यक्ष पुरंदरे यांनी शिक्षक म्हणजे जणू दुसर्यांना प्राणवायू देणारी तुळसच! असे सांगून शिक्षकांचा सन्मान केला. प्रास्ताविकात प्रशालेच्या पर्यवेक्षिका डॉ. सुलभा विधाते यांनी वर्तमान आपल्या हातात आहे तो सजगतेने जगा असे सांगितले. याप्रसंगी पालक-शिक्षक संघातर्फे सर्व शिक्षकांचा तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता काजरेकर यांनी आभार मानले. आशा वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.