विमानतळाला फुटबॉलपटुचे नाव

0

मदैरा । पोर्तुगाल देशाचा फुटबॉलचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे जगभरात चाहते आहे.त्याच्या चाहत्यांन रोनाल्होची प्रत्येक अदा आवडतो. ते ही त्याचप्रमाणे ते ही करतांना दिसतात. रोनाल्डोच्या फुटबॉलसह त्याच्या लूक्सवरही असंख्य चाहते फिदा आहेत. रोनाल्डोची हेअरस्टाईल, त्याची खेळण्याची पद्धत हे सगळे अगदी जसेच्यातसे फॉलो करण्यासाठी चाहते काहीही करण्याची तयारी ठेवतात.

मदैरा शहरानेही रोनाल्डोवरील आपल्या प्रेमापोटी शहराच्या विमानतळाचे नामकरण करून ‘ख्रिस्तियानो रोनाल्डो एअरपोर्ट’ केले आहे. खुद्द रोनाल्डोच्या उपस्थितीत या विमानतळाचे नामकरण करण्यात आले. फुटबॉल सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे आपल्या फुटबॉल कौशल्याने यशाचे शिखर गाठले. 2016 हे वर्ष रोनाल्डोसाठी त्याच्या करिअरमधील खूप महत्त्वाचे ठरले. रोनाल्डोने पॅरिसमध्ये झालेली युरोपियन चॅम्पियनशीप जिंकली.