विमानाचे उड्डाण अडीच तास उशिराने; आमदार, खासदार परतले

1

जळगाव । गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेली जळगावकरांची विमानसेवेची सुरूवात आज होणार आहे. मात्र अंतरराष्ट्रीयच्या मुंबई विमानताळावर स्लॉट निकामी झाल्यामुळे तब्बल अडीच तास उशीराने येणार असल्याचे माहिती सुत्रांकडून मिळाली. त्यामुळे विमान उड्डाणाच्या शुभारंभासाठी खासदार ए.टी.नाना पाटील आमदार हरीभाऊ जावळे, आमदार राजूमामा भोळे, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिताताई वाघ, आमदार डॉ. सतिष पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्यासह पोलिस विभाग स्वागतासाठी उपस्थित होती मात्र विमान अडीच तास उशिराने येणार असल्याने सर्व आमदार व खासदार माघारी परतले आहे.

गावातील ग्रामस्थांचीही होती गर्दी
जळगावकरांच्या सेवेत आज पहिल्या दिवशी विमानाचे उड्डाण होणार असल्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहरातील मान्यवर व परीसरात राहणारे नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. दुपारी 1.50 वाजेच्या सुमारास ही गर्दी चांगलीच जमली होती मात्र अडीच तास विमान उशिराने येणार असल्याचे कळाल्यानंतर नागरीकांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली.

निव्वळ गाजावाजा व जाहिरातबाजी – आमदार डॉ.सतिष पाटील
गाजावाजा करून निव्वळ जाहिरातबाजी करून या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सरकाचे काम हे कधीच वेळेवर होत नसल्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे उड्डाणाच्या माध्यमातून दिसून येत आहे. दीड वाजता येणारे विमान हे तब्बत अडीच तास उशिरा येत आहे. ऐतीहासीक विमानाचे आज जळगाव शहरातून उड्डाण वेळेवर होणार होते. मात्र उशिरा येणार्‍या विमानामुळे पर्यटनावर परीणाम होणार आहे.