जळगाव- विमानातील प्रवासी याच्या बॅगेत रासायनिक स्वरुपात स्फोटके असल्याच्या संशयारुन जिल्हा पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचार्यांची मंगळवारी चांगलीच धावपळ झाली. जळगाव विमानतळावर घडलेल्या प्रकारादरम्यान कसून तपासणी करण्यात आल्यानंतर विमान सोडण्यात आले. तपासणीअंती स्फोटके नसून आढळून आलेली द्रव्य पदार्थ चिंच व गुळाचे मिश्रण असल्याचेही स्पष्ट झाले.
जळगाव विमानतळावर मंगळवारी ट्रूजेट विमानातील प्रवासी धम्मानंद वालेचा रा. अकोला यांची बॅग तपासली असता त्यात 4 बाटल्यांमध्ये संशयास्पद रसायने आढळून आली. याबाबत विमानतळ प्राधीकरणातर्फे एमआयडीसी पोलिसांसह कळविण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना माहिती देवून त्याच्या सुचनेनुसार बॉम्ब शोधक व नाशक पथकालाही पाचारण करण्यात आले. संदिग्ध बॅगच्या सर्व बाजूंनी 07 वेळा चाचणी घेण्यात आली बॅगमध्ये कोणताही स्फोटक आढळला नाही. संशयास्पद स्फोटक म्हणून आढळलेली वस्तू चिंचेचा आणि ऊस गूळ यांचे मिश्रण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टीआरयू जेईटी एअरवेजने अहमदाबादला जाण्यासाठी सर्व प्रवाशांसह उड्डाण केले.