नवी दिल्ली – स्पाइसजेटचे विमान लँड झाल्यानंतर टॅक्सी वेवर जात असताना पायलटने इंजिन चालु करताच त्याच्या जेट ब्लास्टमुळे तेथून जात असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवाशांना घेऊन जात असलेल्या बसची काच फुटली. या बसमध्ये असलेले पाच प्रवासी जखमी झाले. जखमींवर त्वरीत उपचार करण्यात आले.