विमान दुर्घटना स्थळी मुख्यमंत्र्यांनी दिली भेट

0

मुंबई-घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात चार्टर्ड विमान कोसळले असून या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून दुर्घटनेची योग्य चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत आमदार राम कदमदेखील उपस्थित होते.

अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वैमानिक मारिया कुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चार जणांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही यात मृत्यू झाला आहे.